आमचा पत्ता
धावलेश्वर | महाराष्ट्र ४१५३११
ई-मेल
contact@dhawaleshawr.com
दुरध्वनी
+91 98344 42656

ग्रामपंचायत माहिती

ढवळलिंग मंदिर पूर्व इतिहास

ढवळेश्वर हे गांव विटा पासून ७ किमी अंतरावर विटा- भाळवणी रोड वर वसलेले आहे. गावामध्ये ढवळलिंग मंदिर हे जुने हेमंडपंथी मंदिर आहे. हे मंदिर शिव म्हणजेच शंकराचे आहे. हे मंदिर रेवा नदीच्या तिरावरती वसलेले आहे. सदर ढवळलिंग मंदिराचे नावावरून गावास ढवळेश्वर हे नाव पडलेले असून सदर मंदिर सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. सदर मंदिरात दररोज तसेच प्रत्येक आठवड्याचे सोमवारी मोठ्या प्रमाणात परगावाहून भाविक आरती साठी येत असतात. या गावाची यात्रा श्रावण महिन्यात व महाशिवरात्र तसेच गुढी पाडवा या दिवशी असते. अशा वेळी हजारो भक्त गण यात्रेस हजेरी लावून मोठ्या प्रमाणात सासण काठी चा कार्यक्रम होत असतो. ढवळलिंग मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी गावामध्ये भंडारा असतो. त्यावेळी गावामध्ये यात्रेचे स्वरूप असते.

ढवळेश्वर ता. खानापुर , जि. सांगली

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे मुळ गांव ढवळेश्वर हे होते. असा उल्लेख त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात आढळून येतो. मौजे ढवळेश्वर या गावाने शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान”या योजनेत सहभाग घेतला असून ढवळेश्वर हे गाव संपूर्णपणे हरित करणेच्या दृष्टीने विविध योजना व उपक्रम आयोजित केले आहेत. मौजे ढवळेश्वर मध्ये गावातील नागरिकांना माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करणेसंबंधी गावातील सर्व लोकांना गावामध्ये झाडे लावणे माहिती दिली. तसेच पर्यावरणाचे संगोपन व संवर्धन करणेसंबंधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे फेसबुक व Whatsapp पोस्ट द्वारे विविध पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम राबविले.

प्राथमिक भौगोलिक माहिती

ढवळेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुका मधील एक गांव आहे. सदर गांव विटा या ठिकाणापासून ०७ कि. मी. अंतरावर आहे. तसेच तालुका खानापूर या ठिकाणापासून २२ कि. मी. अंतरावर आहे. सांगली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे ५५ कि. मी. अंतरावर गांव आहे.