आमचा पत्ता
धावलेश्वर | महाराष्ट्र ४१५३११
ई-मेल
contact@dhawaleshawr.com
दुरध्वनी
+91 98344 42656

स्मार्ट गाव आर. आर. पाटील पुरस्कार योजना

आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना

ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्रालयने केली .

ग्रामविकास विभागाकडून नोव्हेंबर २०१६ पासून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. ही योजना आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ म्हणून राबविली जाते. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

तसेच त्यांनी राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरु करुन त्या प्रभावीपणे राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस त्यांचे नाव देण्यात आले आहे .

या पुरस्काराचे वितरण दरवर्षी आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री किंवा जिल्ह्यातील मंत्री किंवा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते केले जाते.





ग्रामपंचायत ढवळेश्वर सर्वसाधारण माहिती

वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर

ढवळेश्वर गावामधील सर्व कुटुंबाना १०० टक्के शौचालयाची सुविधा व वापर आहे. हागणदारी मुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त..

पुढे वाचा

सार्वजनिक शौचालय सुविधा व वापर

एकूण सार्वजनिक शौचालय –०७, ग्रामपंचायत कार्यालय –१ युनिट – १, जिल्हा परिषद शाळा –१ मुलांचे – १ मुलींचे – १

पुढे वाचा

पाणी गुणवत्ता तपासणी

जि. प. सांगली आरोग्य विभाग यांचे सार्वजनिक पिण्याचे स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण कामी जोखीम प्रमाणपत्र प्राप्त आहे..

पुढे वाचा

पाणी गुणवत्ता तपासणी

मौजे ढवळेश्वर ग्रामपंचायत मध्ये नियमितपणे पाणीगुणवत्ता तपासणी हि जलसुरक्षक मार्फत तपासणी केली जाते..

पुढे वाचा

सांडपाणी व्यवस्थापन

मौजे ढवळेश्वर गावामध्ये एकूण ४१४ कुटुंबे असून यापैकी ८० % कुटुंबांचे सांडपाणी हे अंतर्गत बंधिस्त गटरचा वापर करत असून..

पुढे वाचा

घन कचरा व्यवस्थापन

मौजे ढवळेश्वर ग्रामपंचायत गावातील सर्व घनकचरा हा ट्रक्टर ट्रोली व हातगाडीचा द्वारे एकत्रीत करून गावाबाहेर वाहून नेऊन..

पुढे वाचा